जेनिलिया लग्नानंतरही चित्रपटात - रितेश - Marathi News 24taas.com

जेनिलिया लग्नानंतरही चित्रपटात - रितेश

www.24taas.com, नवी दिल्ली
 
अभिनेता रितेश देशमुख आणि जेनिलिया डिसूझा यांच्या लग्नाची चर्चा जोरदार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जेनिलिया लग्नानंतरही चित्रपटात काम करील की नाही, याचीही उत्सुकता होती. मात्र, लग्नानंतर जेनिलिया सिनेमात काम करणार असल्याचे रितेशनेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चेला पूर्णविराम  मिळाला.
 
 
रितेशने  लग्नाच्या तयारीविषयी बोलणे टाळले; मात्र २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत असलेल्या 'तेरे नाल लव्ह हो गया' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूप बिझी असल्याचे त्यांने स्पष्ट केले.  लवकरच रितेशचा 'हाऊसफुल्ल 2'देखील प्रदर्शित होत आहे.  'तेरे नाल लव्ह हो गया' आणि  'हाऊसफुल्ल 2' या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळेल, असेही रितेशने यावेळी सांगितले.
 
 
जेनिलिया अभिनेत्री म्हणून यापुढेही करिअर सुरू ठेवण्याचा निर्णय सर्वस्वी तिचाच असेल. तिच्या कारकिर्दीत अडथळा येण्याचे कोणतेही कारण नाही. आमचे नाते हे खूपच खासगी होते. त्यामुळे याविषयी कुठेही कसलीही वाच्यता करणे आम्ही दोघांनी टाळले होते. आता आम्ही या विषयावर मोकळेपणाने बोलत आहोत, कारण आमच्या नात्याचे रूपांतर काही दिवसांतच एका चांगल्या बंधनात होणार असल्याचे रितेशने सांगितले.
 
 

First Published: Wednesday, February 1, 2012, 12:52


comments powered by Disqus