Last Updated: Wednesday, February 1, 2012, 12:40
www.24taas.com, मुंबई 
शाहरुख खान आणि फराह खान यांच्यातला वाद मिटल्याचं सांगितलं जात असलं, तरी किंग खानचा राग मात्र अजूनही गेलेला दिसत नाही. शाहरुखबरोबर पॅचअप झाल्याचं एकीकडे फराह खाननं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे किंग खानची मात्र चिडीचूप बसला आहे.
प्रसिद्ध कोरीओग्राफर-दिग्दर्शिका फराह खानचा पती शिरीष कुंदर आणि शाहरुख खान या दोघांमध्ये अखेर समेट झाला आहे असं फराह खान हिने स्पष्ट केल आहे. फराहचा भाऊ साजीद खान आणि निर्माता साजीद नाडीयदवाला या दोघांच्या प्रयत्नामुळे फराह खान आणि किंग खान यांच्यातली दरी कमी झाली आहे. अग्निपथ सिनेमाच्या यशाबद्दल संजय दत्तने आयोजित केलेल्या पार्टीत शाहरुख खानने आपल्या एकेकाळची मैत्रीण असलेल्या फराह खानच्या नवऱ्याच्या म्हणजेच दिग्दर्शक शिरीष कुंदरच्या जोरदार थप्पड मारली.
ही घटना रविवारी रात्री घडली. संजय दत्तकडील पार्टीत शाहरुख आणि शिरीष कुंदर यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. शिरीष कुंदरही शाहरुखच्या विरोधात बोलत होता. मात्र, अनेक प्रयत्न करूनही या प्रकरणावर शाहरुख खानची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
First Published: Wednesday, February 1, 2012, 12:40