माधुरी दीक्षितची 'वेबसाइट' सुरू - Marathi News 24taas.com

माधुरी दीक्षितची 'वेबसाइट' सुरू

www.24taas.com, मुंबई
 
माधुरी दीक्षितच्या चाहत्यांसाठी एक खूषखबर आहे. आपली स्वतःची वेबसाईट असलेल्या स्टार्सच्या यादीत आता माधुरी दीक्षितचीही भर पडली आहे. माधुरी दीक्षितने स्वतःची वेबसाईट सुरू केली आहे.
 
हृतिक रोशन, प्रियंका चोप्रा, गुल पनाग या कलाकारांची स्वतःची वेबसाईट आहे. याच कलाकारांच्यासारखी माधुरी दीक्षितनेही स्वतःची वेबसाईट लाँच केली आहे. सध्या माधुरीच्या वेबसाईटवर तिचा काळ्या कपड्यातला स्टायलिश फोटो पाहायाला मिळतो.
 
ट्विटरवर आपल्या वेबसाईट संदर्भात घोषणा करताना माधुरी दीक्षितने लिहीलं आहे, “माझी माधुरी दीक्षित ही वेबसाइट सुरू झालेली आहे. त्याद्वारे तुम्ही आता माझ्याशी संपर्क साधू शकता. तुमच्याकडून बरंच काही ऐकायला मिळेल अशी आशा आहे.”
 
'माधुरी दीक्षित-नेने.कॉम' असं या वेबसाइटचं नाव आहे. ही वेबसाइट अधिकाधिक छान बनवण्यासाठी काही इंटरेस्टिंग गोष्टी मिळवण्यात माधुरी सध्या बिझी आहे

First Published: Wednesday, February 1, 2012, 15:52


comments powered by Disqus