सुशीलकुमार शिंदेंच्या जीवनावर चित्रपट! - Marathi News 24taas.com

सुशीलकुमार शिंदेंच्या जीवनावर चित्रपट!

मुग्धा देशमुख, www.24taas.com, मुंबई
 
फार मोजक्या व्यक्तींची जीवनकहाणी दुसऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते. असंच एक अनोखं व्यक्तिमत्व म्हणजे सुशीलकुमार शिंदे.राखेतून गगनभरारी घेणाऱ्या या फिनिक्सची कथा आता सिल्व्हर स्क्रीनवर साकारणार आहे.
 
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जीवनपट आता पडद्यावर साकारणार आहे. ‘मी सुशीलकुमार शिंदे’ या नव्या सिनेमातून त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचं चित्रण पाहायला मिळेल. सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय त्याचप्रमाणे वैयक्तिक आयुष्याचे विविध कंगोरे यात पाहायला मिळतील. चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरु आहे. या चित्रपटात सुशीलकुमार यांची व्यक्तिरेखा मनिष कुलकर्णी साकारत आहेत, तर त्यांच्या पत्नी उज्वला शिंदे यांची भूमिका शर्वरी लोहकरे करत आहे.
 
हा सिनेमा कुठल्याही पॉलिटिकल सेन्सॉरशीपमध्ये अडकू नये यासाठी निर्मात्यांनी योग्य ती काळजी घेतली आहे. अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून वर येत गगनभरारी घेणारे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे सुशीलकुमार शिंदे. यांच्या जीवनकथेवर आधारीत असणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकराजाची पसंती मिळतेय का हे आता पाहायचं आहे.
 

First Published: Wednesday, February 1, 2012, 19:38


comments powered by Disqus