सिनेमा टॅक्स फ्री? छे छे...... - Marathi News 24taas.com

सिनेमा टॅक्स फ्री? छे छे......

www.24taas.com
 
सिनेरसिकांना आता थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी आणखी जास्त पैसै खर्चावे लागणार आहे. कारण की लवकरच सरकार सिनेमावरील सर्विस टॅक्स वाढविण्याचा विचार करीत आहे. पण त्यामुळे सिनेरसिकांचा मात्र हिरमोडच होईल.
 
सरकार सिनेमावरील सर्विस टॅक्स वाढवण्याच्या विचाराधीन आहे. त्यामुळे  फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने २३ फेब्रुवारी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा संप एकदिवसीय किंवा बेमुदत असेल याबद्दल अजून निर्णय झालेला नाही.
 
जवळपास १०.३ टक्के सर्व्हिस टॅक्स वाढण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे चित्रपट निर्माते अंसतुष्ट आहेत. यामुळे चित्रपटाचे बजेट वाजवीपेक्षा जास्त वाढेल अशी धास्ती त्यांना वाटते आहे. त्यामुळे सर्व्हिस टॅक्सविरोधात त्यांनी संपावर जाण्याचं निश्चित केलं आहे. हा संप देशव्यापी असून यादिवशी एकही चित्रपट प्रदर्शित होणार नाही असं फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने जाहीर केलं आहे.
 
 

First Published: Thursday, February 2, 2012, 15:39


comments powered by Disqus