Last Updated: Saturday, October 29, 2011, 13:03
झी २४ तास वेब टीम, मुंबईबिग बी अंमिताभ बच्चन यांचा बोगस आयडी वापरुन ट्विटरवर रा-वन सिनेमावर केलेल्या टीका टिपण्णीनं बिग बी व्यथित झाले असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी बिग बींची पाठराखण केली आहे. बीग बी अमिताभ यांना भारतरत्न द्या अशी मागणी बाळासाहेबांनी केली आहे. मात्र अमिताभ यांचं सोनिया गांधीशी वाकडं असल्यानं काँग्रेस सरकार आणि काँग्रेसचे पुढारी अमिताभना व्यक्तीगत शत्रू मानत असल्याचंही बाळासाहेबांनी म्हटलं आहे. अनेक देशांमध्ये भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान कोण आहेत हे माहित नाही पण अमिताभ माहित आहेत अशा शब्दात बीग बीचा मोठेपणा बाळासाहेबांनी अधोरेखित केलाय.
First Published: Saturday, October 29, 2011, 13:03