Last Updated: Tuesday, November 1, 2011, 13:13
झी २४ तास वेब टीम, मुंबई६० आणि ७० च्या दशकातील अंडरवर्ल्डचं चित्रण आपल्याला दिसलं ते 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' या सिनेमामध्ये.
या सिनेमातून दाऊद इब्राहिम आणि हाजी मस्तान यांच्या दहशतीचं चित्रण आपल्या समोर आलं. यात अजय देवगणची व्यक्तरेखा हाजी मस्तानशी सार्धम्य साधणारी होती तर इम्रान हाश्मीची व्यक्तीरेखा दाऊदशी मिळतीजुळती होती. या सिनेमामध्ये दहशत हा मुख्य गाभा होता.
मात्र या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये दहशतीपेक्षाही रोमॅण्टिक अंदाज आपल्याला जास्त दिसेल. आणि हा रोमॅन्स आपल्याला करीना कपूर सिल्व्हर स्क्रीनवर साकारताना आपल्याला दिसणार असल्याची चिन्ह आहेत.
करीनाचा रोल मंदाकिनीशी सार्धम्य साधणारा आहे असं बोललं जातंय. त्यामुळे या सिनेमामध्ये दहशतीसह रोमॅन्सदेखिल आपल्याला पाहयाला मिळेल. मात्र मंदाकिनीसारखी व्यक्तीरेखा साकारणं करीनासाठी आव्हानात्मकच आहे. त्यामुळे करीना आता हे आव्हान कसं स्वीकारते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
First Published: Tuesday, November 1, 2011, 13:13