रितेश-जेनेलियाच्या रिसेप्शनला ऐश्वर्या उपस्थित - Marathi News 24taas.com

रितेश-जेनेलियाच्या रिसेप्शनला ऐश्वर्या उपस्थित

www.24taas.com, मुंबई
 
मराठी आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने विवाह केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रितेश- जेनेलियाच्या रिसेप्शनलाही समस्त बॉलिवूड हजर होतं. यावेळी पहिल्यांदाच ऐश्वर्या राय-बच्चन आपले सासू-सासरे अमिताभ आणि जया बच्चन यांच्यासोबत उपस्थित होती. गेल्या १६ नोव्हेंबरला मुलीला जन्म दिल्यानंतर ऐश्वर्या पहिल्यांदाच अशा सार्वजनिक समारंभाला हजर होती.
 
लग्नानंतर रितेश-जेनेलिया यांनी काल रात्री मुंबईतल्या ग्रँड हयात येथे रिसेप्शन आयोजित केले होते. जेनेलियाने या कार्यक्रमात गडद पीच रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, तर रितेशने काळा कुर्ता घातला होता.
 
 
या कार्यक्रमाला माधुरी दीक्षित, जूही चावला, बिपाशा बासू, सैफ अली खान, करीना कपूर, आमिर खान, इम्रान खान व पत्नी अवंतिका, अनुष्का शर्मा, आफताब शिवदासानी, अर्शद वारसी, अमीषा पटेल, जिया खान, सुष्मिता सेन, रणधीर कपूर, अब्बास मस्तान, जॅक्लीन फर्नांडिस, झाएद खान, हिमेश रेशमिया, झरीन खान, शेखर सुमन, बप्पी लहरी, अतुल अग्निहोत्री, अलविरा, अर्पिता खान, डब्बू रत्नानी, मिथुन चक्रवर्ती तसंच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि पत्नी नीता अंबानीही उपस्थित होते.

First Published: Tuesday, February 7, 2012, 11:59


comments powered by Disqus