रजनीकांत-दीपिका रुपेरी पडद्यावर एकत्र - Marathi News 24taas.com

रजनीकांत-दीपिका रुपेरी पडद्यावर एकत्र

www.24taas.com, चेन्नई
 
रोबोटमध्ये ऐशवर्या राय आणि रजनीकांत या जोडीने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. रजनीकांतच्या अभिनयातल्या उर्जेने तमिळ रसिक प्रेक्षकांवर अक्षरश: गारुड केलं आहे. आणि त्यामुळेच अवघ्या वीशीतल्या अभिनेत्रींसोबतही तो त्याच जोमाने उभा ठाकतो.
 
आता बॉलिवूडमधली हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेल्या दीपिकासोबत तो रुपेरी पडद्यावर जोडी जमवणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. दीपिका रजनीकांत सोबत काम करणार का नाही याविषयी अनेक प्रकारचे अंदाज वर्तवण्यात आले. याआधीही एका सिनेमात दीपिका रजनीकांत सोबत काम करणार होती पण मध्यंतरी त्याच्या आजारपणामुळे ते राहुनच गेलं होतं.
 
पण अखेरीस प्रतिक्षा संपली आहे रजनीकांतची मुलगी सौंदर्या आर.आश्विनने 'कोचादैय्यान' या सिनेमात दीपिका काम करणार असल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला आहे. या सिनेमाची निर्मिती सौंदर्या करणार आहे. सौंदर्याने आपला आनंद ट्विटवर ट्विट करुन व्यक्त केला आहे. दीपिका रजनीकांत सोबत काम करणार असल्याचं निश्चित झालं असल्याचं तिने म्हटलं आहे. आता दीपिका आणि रजनीकांतची पेअर काय जादू करते ते पाहायला सर्वच उत्सुक आहेत.
 
 
 

First Published: Wednesday, February 8, 2012, 08:57


comments powered by Disqus