इम्रानच्या आयुष्यातील सन्मानाचा क्षण - Marathi News 24taas.com

इम्रानच्या आयुष्यातील सन्मानाचा क्षण

www.24taas.com, नवी दिल्ली
 
मॉरेशिसचे पंतप्रधान डॉ.नवीनचंद्र रामगुलाम आणि त्यांच्या पत्नी वीणा यांच्या सन्मानार्थ आयोजीत स्टेट डिनरला (सरकारी मेजवानी) बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आमंत्रित केलं होतं. डॉ.नवीनचंद्र रामगुलाम आणि त्यांच्या पत्नी वीणा यांनी हैदराबाद हाऊस इथे आयोजित सरकारी मेजवानीला इम्रान खानला आमंत्रित करण्याची खास विनंती केली होती.
 
इम्रानचे 'जाने तू या जाने ना' आणि 'आय हेट लव स्टोरीज' या दोन्ही सिनेमांनी मॉरेशिसमध्ये चांगली लोकप्रियता प्राप्त केली होती. इम्रान सध्या 'एक मै और एक तू' या सिनेमाच्या प्रमोशमध्ये बिझी असल्याने त्याला उपस्थित राहण्यासाठी खास वेळ काढावा लागला.







इम्रानला याविषयी विचारला असता तो म्हणाला, की पंतप्रधानांनी आयोजित मेजवानीसाठी आमंत्रण येणं हा मी माझा सन्मान समजतो. काही दिवसांपूर्वी 'कोलावरी डी'चा गायक धनुषला देखील जपानचे पंतप्रधान योशिहिको नोडा यांच्य सन्मानार्थ आयोजीत मेजवानीला पंतप्रधानांनी आमंत्रित केलं होतं.
 
 

First Published: Wednesday, February 8, 2012, 15:04


comments powered by Disqus