Last Updated: Friday, February 10, 2012, 14:10
www.24taas.com,मुंबई विधानसभेत पॉर्न व्हिडिओ पाहिल्याबद्दल गच्छंती झालेले कर्नाटक सरकारमधील भाजपचे तीन मंत्री मॉडेल पूनम पांडेचा पॉर्न व्हिडिओ पाहत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. हो हो तीच पूनम पांडे जिने टीम इंडिया जिंकल्यावर टॉपलेस होण्याचे जाहीर केले होते.
आता या पूनम पांडेच्या व्हिडिओने कर्नाटकचे मंत्री ‘कॅरेक्टर लेस’ झाले आहेत. त्यामुळे त्यांना राजीनामाही द्यावा लागला. या घटनेबद्दल पूनम पांडेने मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर टिवटीव केली की, कोणताही नॅशनल इश्यू झाला की माझ्यावरच येऊन का संपतो हे मला कळत नाही. मी कसे काय सांगू शकते की तो व्हिडिओ माझाचं होता. माझ्या फॅन्सचे हे प्रेम आहे की घृणा हे मला समजत नाही. या सर्व प्रकरणाकडे मी फारसं लक्ष देत नाही.
यापूर्वी अनेक वादांमध्ये स्वतःची पब्लिसिटी करून घेणारी पूनम पांडेने काल या मंत्र्यांची ट्विटरवर खिल्ली उडवली. ती म्हणाली, विधानसभेतील दोन्ही मंत्री कन्फ्यूज्ड प्राणी आहेत. कर्नाटकचे मंत्री विधानसभेच्या व्हॅलेंटाइन वीकचा पॉर्नगेट साजरा करीत होते. हीही…हीही…हीही…।
First Published: Friday, February 10, 2012, 14:10