Last Updated: Monday, February 13, 2012, 14:12
www.24taas.com 
हाऊसफुल या सिनेमाच्या यशानंतर आता आपल्या समोर हाऊसफुल २ येतो आहे. साजिद खान याच्या हाऊसफुल या सिनेमाला प्रेक्षकांनी दिलेला चांगला प्रतिसाद यामुळे तो आता हाऊसफुल २ घेऊन आला आहे. साजिद खान दिग्दर्शित 'हाऊसफुल' सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला आहे. पुन्हा एकदा विनोदविरांची भट्टी जमली आहे ती हाऊसफुल २ सिनेमाच्या निमित्ताने.
साजिद खान दिग्दर्शित हाऊसफुल सिनेमा प्रेक्षकांना भावला होता. त्यामुळे या यशानंतर साजिद आता हाऊसफुल सिनेमाचा पार्ट २ प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे. आणि या पार्ट २ मध्ये कथानकाप्रमाणे स्टारकास्टमध्येही अनेक बदल पाहायाला मिळणार आहेत.
या सिनेमात जॉन अब्राहम, अक्षय कुमार, आणि रितेश देशमुखसह असीन, जॅकलिन फर्नांडिस, झरीन या मादक अभिनेत्री झळकणा आहेत. तसंच या सिनेमामध्ये मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर आणि रणधीर कपूरही विनोदाचा तडका लावताना दिसणार आहेत. एकूणच फूल टू एन्टंरटेन्मेंट असलेल्या या सिनेमाला प्रेक्षक हाऊसफुल गर्दी करतात का हे लवकरच कळेल.
First Published: Monday, February 13, 2012, 14:12