सलमानचं 'लकी' लव्ह लाईफ - Marathi News 24taas.com

सलमानचं 'लकी' लव्ह लाईफ

www.24taas.com, मुंबई
 
सलमान खान ऑन स्क्रीन लव्ह गुरू बनून इतरांना प्रेमाचे टिप्स देत असला तरी सलमानची स्वतःची लव्ह लाईफ फारशी यशस्वी ठरली नाही मात्र असं असलं तरीही सलमान खान स्वत: ला प्रेमामध्ये लकी मानतो.
 
सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ, झरीन अशी सलमान खानच्या गर्लफ्रेन्ड्सची लिस्ट ही न संपणारी आहे. मात्र सलमानचं अफेअर सर्वात जास्त चर्चेत राहिलं ते ऐश्वर्या रायसह. ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमाच्या दरम्यान सलमान आणि ऐश्वर्या ऑन स्क्रीनसह ऑफ स्क्रीनही एकत्र आले. मात्र या प्रेमात काटेच अधिक आहेत याची प्रचीती ऐश्वर्याला आली आणि सलमानचं हे सर्वात गाजलेलं प्रेमप्रकरण संपुष्टात आलं. यानंतर सलमानच्या आयुष्यात आली कतरिना कैफ. सलमानच्या या नव्या पार्टनरला प्रेक्षकांनी खूपच पसंत केलं. त्यामुळे ऑन स्क्रीनसह ऑफ स्क्रीनही ही मैत्री अधिक खुलली. हे दोघे लग्नगाठीत बांधले जाणार असंही बोललं जायचं मात्र नंतर लगेचच या दोघांच्या लग्नाऐवजी ब्रेकअपच्याच चर्चा अधिक रंगू लागल्या. कतरिना कैफनंतर सलमानचं नाव झरीनशीही जुळलं गेलं. झरीनमध्ये कतरिनाची झलक दिसते त्यामुळेच सलमान झरीनकडे आकर्षित झाला असंही बोललं गेलं मात्र सलमानचं हे अफेअरही काही यशस्वी होऊ शकलं नाही. त्यामुळे सलमान प्रेमाच्या बाबतीत अनलकी असल्याचं बोललं जातंय मात्र खुद्द सलमानला हे मान्य नाही.
 
एकूणच सलमान खानची प्रेमकहाणी ही त्याच्या फिल्मपेक्षाही जास्त इंटरेस्टिंग वाटतेय. कारण प्रेमामध्ये अपयश येऊनही सलमान खान काही हार मानायला तयार नाही त्यामुळे सलमान खानकडे बघून हेच म्हणावंस वाटतंय की प्रेमा तुझा रंग कसा?

First Published: Tuesday, February 14, 2012, 10:05


comments powered by Disqus