रजनीच्या रंगात रंगणार दीपिका - Marathi News 24taas.com

रजनीच्या रंगात रंगणार दीपिका

www.24taas.com, मुंबई
 
दीपिका पदुकोणला सुपरस्टार रजनीकांत सोबत रुपेरी पडद्यावर झळकण्याचं भाग्य लाभणार असलं तरी त्यासाठी तिला मोठे बदल आत्मसात करावे लागणार आहेत. दीपिका पदुकोणला पदार्पणानंतर अवघ्या पाच वर्षातच ही सूवर्णसंधी मिळाली. रजनीकांत आणि दीपिका कोचादाईय्याँ या सिनेमात एकत्र काम करत आहेत. या सिनेमातील रजनीकांत साकारत असलेल्या भूमिकेच्या स्कीन टोनशी मॅच होण्यासाठी दीपिकालाही आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत.
 
या सिनेमाशी संबंधित सूत्राने एका टॅबोलॉईडशी बोलताना सांगितलं की परदेशातून आयात केलेल्या एक विशेष टेकनिकचा वापर करुन रजनीकांतच्या स्कीन टोनशी मिळतजुळतं लुक देण्यात येणार आहे. दीपिकाची त्वचा रजनीकांतपेक्षा उजळ असल्या कारणाने डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. दीपिकाला जेंव्हा स्कीन कलरमध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील असं सांगण्यात आलं तेंव्हा तिने त्याला उत्साहाने होकार दर्शवला.
 
दीपिकाची भूमिका महत्वाची असल्याने हे नवीन तंत्र स्वीकारण्याच्या बाबतीत तिने उत्साह दाखवला आहे आणि आवश्यक ते सारं करण्याची तयारी दर्शवली आहे असं सहनिर्माते डॉ.मुरली मनोहर यांनी सांगितलं. तमिळ सिनेसृष्टीत जीवंतपण दंतकथा झालेल्या रजनीकांतसोबतच्या संधीचं सोनं करण्यासाठी दीपिकाची सर्व प्रकारची मेहनत घेण्यात तयार आहे.

First Published: Thursday, February 16, 2012, 15:31


comments powered by Disqus