११.११.११साठी ऐश्वर्याचा 'बाल'हट्ट - Marathi News 24taas.com

११.११.११साठी ऐश्वर्याचा 'बाल'हट्ट

झी २४ तास वेब टीम, मुंबई
 
ऐश्वर्या राय काही दिवसातंच आई होणार आहे. येणारा पाहुणा अमिताभ बच्चन यांची नातवंड असल्यामुळे सा-या जगाचंच लक्ष येणा-या बाळाकडे लागलं आहे. ऐश्वर्या आणि अमिताभबरोबरच  छोटे मियॉँ अभिषेकला येणाऱ्या बाळामुळे 'पा' ही नवी ओळख मिळणार आहे. त्यामुळे  येणाऱ्या बाळाबद्दल संबंध बच्चन कुटुंबानेच स्वप्न रंगवायला सुरुवात केली आहेत.आपल्याला पहिलं कन्यारत्न प्राप्त व्हावं असंच अभिषेकला वाटतंय. आता अभिषेकचं हे स्वप्न पूर्ण होतंय का हे पाहाणं इन्ट्रेस्टिंग ठरणार आहे. ऐश्वर्या राय हीची ड्यू डेट १४ नोव्हेंबर असली तरीही ११ नोव्हेंबर २०११ही दुर्मिळ तारीख साधूनंच ऐश्वर्या बाळाला जन्म देण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे. शिवाय अमिताभ यांची जन्मतारीखही ११ ऑक्टोबर हीच आहे. त्यामुळे 'लकी डेट' म्हणून ११ तारखेलाच नव्या बाळाचं आगमन होण्याची शक्यता आहे.
 
आता बच्चन कुटुंबातला नवा पाहुणा कुठे जन्माला येणार आहे याचीही उत्सुकता बच्चन फॅन्समध्ये आहे.  ऐश्वर्या बच्चन अंधेरी पश्चिममधल्या 'सेव्हेन हिल्स' या हॉस्पिटलमध्ये आपल्या बाळाला जन्म देणार आहे. डॉ. विनीता साळवी या ऐश्वर्याच्या प्रसुती तज्ञ आहेत. तिच्यासाठी १० ते १५ नोव्हेंबर पर्यंत व्हीआयपी डिलक्स सूट बूक करण्यात आलाय. तेव्हा बच्चन कुटुंबाकडून बाळाच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तेव्हा आता अभिषेक बाबा झाल्याच्या आनंदात पेढे वाटतो की बर्फी याचीच प्रतीक्षा आहे.

First Published: Friday, November 4, 2011, 11:01


comments powered by Disqus