सलमानचा शिवरात्री निमित्त उपवास - Marathi News 24taas.com

सलमानचा शिवरात्री निमित्त उपवास

www.24taas.com, मुंबई
 
सलमान खान महाशिवरात्रोत्सव साजरा करणार असल्याचं वृत्त आहे.  सलमानने शिवरात्र निमित्त उपवास ठेवला आहे.  सलमान दरवर्षी घरी गणपती बसवतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच. यंदा सलमान खानने आपल्या फार्महाऊसवर शिवरात्रीनिमित्त महाप्रसादाचं आयोजन केलं आहे. सलमान सध्या कतरिना कैफसोबत क्युबात एक था टायगरच्या शुटिंगमध्ये व्यस्त होता. एका खात्रीलायक सूत्रानुसार क्युबावरुन सलमान परतल्यानंतर महाशिवरात्री साजरी करण्यासाठई फार्महाऊसवर दाखल झाला आहे.
 
सलमान त्याच्या कुटुंबियांसमवेत तसंच फार्महाऊसजवळ असलेल्या गावकऱ्यांसोबत शिवरात्र उत्सव साजरा करणार आहे. सलमानचे वडिल सलिम खान शिवपूजेच्या तयारीसाठी शनिवारीच फार्महाऊसवर पोहचले होते. सलमानचे दोन्ही भाऊ अरबाज आणि सोहेलही फार्महाऊस शिवरात्री उत्सवासाठी येणार आहेत. सलमाने फार्महाऊसवर शिवमंदिर बांधले असून एका पूजाऱ्याची पूजेसाठी नेमणुकही केली आहे. एवढचं नाही तर सलमानने शिव,काली या देवतांची पेटिंगजही रेखाटली आहेत. सध्या आजारपणाने त्रस्त असलेल्या सलमानवर शिवशंकराची कृपादृष्टी व्हावी यासाठी आपणही प्रार्थना करायला काय हरकत आहे ?
 
 

First Published: Monday, February 20, 2012, 15:56


comments powered by Disqus