अश्लिलता = शर्लिन VS सनी लिऑन - Marathi News 24taas.com

अश्लिलता = शर्लिन VS सनी लिऑन

www.24taas.com, मुंबई
 
ट्विटरवर आपल्या चाहत्यांना अश्लिलतेचा डोस दिलेल्या शर्लिन चोप्राने हे केवळ प्रसिद्धीसाठी आणि ‘जिस्म २’मधील पॉर्न मॉडेल सनी लिऑनशी अश्लिलतेच्या बाबतीत स्पर्धा करण्यासाठी  केल्याचे उघड झाले आहे.
 
 
शर्लिन चोप्राने न्यूड पोज दिल्यानंतर अनेक ठिकाणी तिच्या बातम्या झळकल्या. मॉडेल असलेल्या शर्लिनने  बॉलिवुडमध्ये प्रवेश  केला. शर्लिन चोप्राने आता सनी लिऑनसारखी पोझ दिली आहे. आता ही बया विचारते की सनी लिऑनने चांगली न्यूड पोझ दिली की मी आणि हद्द म्हणजे ती चाहत्यांना विचारते, माझ्या न्यूड पोझ नंतर खरं सांगा या रोलसाठी  कोण सूट होतयं?
 
आपल्या ‘जिस्म’चा फायदा करून सिल्वर स्क्रिनच्या निर्मात्याना हदरवून टाकण्याचा डाव शर्लिने आखला आहे आणि आता ती पॉर्न स्टार सनी लिऑनशी दोन-दोन हात करण्याच्या तयारीत आहे.
 
यासाठी तीन ट्विटरवर ओपिनियन पोल घेतला आहे. तीने ‘जिस्म २’च्या रोलला कोण अधिक न्याय देईल, या संदर्भात चाहत्यांना विचारणा केली आहे.

First Published: Tuesday, February 21, 2012, 15:54


comments powered by Disqus