विद्याला साकारायच्या आहेत 'इंदिरा गांधी'! - Marathi News 24taas.com

विद्याला साकारायच्या आहेत 'इंदिरा गांधी'!

www.24taas.com, मुंबई 
 
विद्या बालन हिला स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधींवर एखदा सिनेमा बनल्यास त्यात काम करण्याची इच्छा आहे. “मला एखाद्या सिनेमात इंदिरा गांधींची भूमिका साकारायला आवडेल.” असं विद्या बालन म्हणाली.
 
'परिणिता' पासून ते 'डर्टी पिक्चर'पर्यंत आपल्या लाजवाब अभिनयाचा अवाका विद्या बालनने यापूर्वीच दाखवला आहे. आगामी कहानी या सिनेमात विद्या ९ महिन्यांच्या गरोदर स्त्रीची भूमिका साकारत आहे, जिचा नवरा बेपत्ता झाला आहे. स्त्रीप्रधान आणि दमदार व्यक्तिरेखा साकारण्यात सध्या विद्या बालन आघाडीवर आहे. विद्याला आता विवाहबाह्य संबंधांसारख्या आव्हानात्मक विषयावर काम करण्यासाठी उत्सुक आहे.
 
विद्याच्या मते आपल्या जीवनात अनेक चढ उतार असतात आणि ते प्रभावीपणे मांडता यावेत अशी संधी देणाऱ्या भूमिका तिला साकारायच्या आहेत. 'अर्थ' किंवा 'सिलसिला' सारख्या सिनेमांत विवाहबाह्य संबंध ज्या प्रकारे अधोरेखित केले आहेत आणि रेखा, स्मिता पाटील, शबाना आझमी यांसारख्या अभिनेत्रींनी जितक्या प्रगल्भतेने अभिनय केला आहे, त्याच पद्धतीने मला अशा सिनेमांमध्ये व्यक्तिरेखा साकारायची आहे.
 
सध्या विद्या बालन पुन्हा एकदा इम्रान हाश्मीबरोबर 'घनचक्कर' या सिनेमात काम करत आहे. हा सिनेमा विनोदी आहे. विद्याला कॉमेडी सिनेमे आवडतात आणि यात वेगळेपणा देण्याचा ती प्रयत्न करणार आहे असं तिचं म्हणणं आहे.

First Published: Tuesday, February 21, 2012, 17:51


comments powered by Disqus