'दबंग-२' साठी 'चुलबुल पांडे' सज्ज - Marathi News 24taas.com

'दबंग-२' साठी 'चुलबुल पांडे' सज्ज

www.24taas.com, मुंबई
 
सलमान खान पुन्हा एकदा 'चुलबुल पांडे'ची भूमिका करण्यासाठी तयार झाला आहे. 'दबंग'ला मिळालेल्या तुफान यशानंतर त्याचा पुढचा भाग लवकरच प्रेक्षकांपुढे येणार आहे.
 
मात्र यावेळी दबंगचं दिग्दर्शन अभिनव कश्यप न करता सलमानचाच धाकटा भाऊ आभिनेता आणि निरमाता अरबाझ खान करत आहे. त्यामुळे 'दबंग-२' मधल्या आपल्या भूमिकेबद्दल सलमान खान यावेळी जास्तच सजग झाला आहे.
 
सलमानची नायिका या भागातही सोनाक्षी सिन्हाच असणार आहे. त्यामुळे सलमान-सोनाक्षीचीच जोडी प्रेक्षकांना अनुभवायला मिलणार आहे. मात्र, दबंगचा व्हिलन असणारा 'छेदी सिंग' सोनू सुद मात्र या भागात नसेल. 'सिंघम'मधील 'जयकांत शिक्रे'ची भूमिका केलेल्या  प्रकाश राजला खलनायकाच्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र, अजूनही व्हिलनची भूमिका कोण करणार आहे, ते गुप्त ठेवण्यात आलं आहे.

First Published: Thursday, February 23, 2012, 16:30


comments powered by Disqus