Last Updated: Thursday, February 23, 2012, 21:56
www.24taas.com, मुंबई
'अखेर सुटका होणार...' असे बॉलिवूड शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी काल रात्री मायक्रो ब्लॉगिंग साइटवर ट्विटरवर ट्विट केले होते. अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमधून सुटका होण्याची वाट पाहत होते. त्यांची इच्छा अखेर पूर्ण झाली.
मुंबईच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये अमिताभ बच्चन यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे त्यांना १२ दिवस हॉस्पिटलमध्ये काढावी लागली होती. हॉस्पिटलच्या प्रशासनाने काढलेल्या पत्रकानुसार अमिताभ बच्चन यांना आज सायंकाळी सातच्या सुमारास सोडण्यात येणार असल्याचे नमूद केले होते. त्यानुसार आज त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला.
'कुली' सिनेमामध्ये एका मारामारीच्या सिनमध्ये फाईट चुकवण्यासाठी अमिताभ यांना टेबलाचा पत्रा पोटाला लागल्याने त्यांच्या आतडीला गंभीर दुखापत झाली होती. त्यातून बिग बी बऱ्यापैकी सावरले मात्र अधूनमधून त्यांना पोटाची व्याधी त्रास देत असते.
First Published: Thursday, February 23, 2012, 21:56