बिपाशा म्हणते ह्योच नवरा पाहिजे.... - Marathi News 24taas.com

बिपाशा म्हणते ह्योच नवरा पाहिजे....

www.24taas.com, मुंबई
 
सिनेमा विकण्यासाठी कोणत्याही थराला बॉलिवूडवाले जाऊ शकतात याचं हे आणखी एक उदाहरण. माधवन आणि बिपाशा बसू यांची जोडी ब्रेकर्स नावाचा सिनेमा लवकरच रिलीज होत आहे. आता त्यांच्यात एकमेकांबद्दल किती जिव्हाळा आहे, ते एकमेकांचे कसे जिवलग मित्र-मैत्रिणी आहेत याच्या बातम्या पध्दतशीरपणे माध्यमात तुम्हाला वाचायला मिळाल्या असतीलच. बिपाशा आणि माधवन यांच्या मध्ये असलेल्या केमिस्ट्रीमुळे जोडी ब्रेकर्समध्ये काय कमाल करुन दाखवली आहे इत्यादी इत्यादी.
 
आता बिपाशा म्हणते की तिला माधवन सारखा नवरा हवा आहे. अग सटवे या आधी जॉनबरोबर तुझं सूत जुळलं होतं तेव्हा हा साक्षात्कार का तुला झाला नव्हता. आता सिनेमा रिलीजच्या वेळेसच एकदम तुला असं काय त्याच्यात दिसलं. बरं माधवनचं लग्न झालेलं आहे आणि त्याच्या बायकोला कळलं तर माधवन आणि सरिताची (सौ.माधवन) जोडी ब्रेक होईल ना. पण असं होणार नाही कारण माधवनच्या बायकोला ठाऊक आहे की जोडी ब्रेकरचा गल्ला जमे पर्यंत हा कल्ला चालू राहणार आहे. आणि बिपाशाला कितीही वाटलं तरी माधवनला आयुष्यातून उठायचं नाहीये.
 
माधवनला विचारलं की बिपाशा तुला हॉट वाटते का आता विचाऱणाऱ्याकडे बौद्धिक दारिद्रय भरपूर प्रमाणात तरी असावं नाहीतर कल्पना शक्तीचा अभाव. बिपाशाकडे ही एकच गोष्ट असल्यामुळेच ती दिर्घकाळ बॉलिवूडमध्ये करिअर करु शकली. दक्षिण भारतीय पुरुष तुला आकर्षक वाटतात का असं विचारल्यावर बिपाशा म्हणते की नवरा कसा असावा याचा निकष म्हणजे माधवन होय. अगं बाई पुढच्या सिनेमात नायक बदलला की तुझे निकषही बदलतील तुझा काय भरवसा बाई.
 
 

First Published: Friday, February 24, 2012, 14:52


comments powered by Disqus