बिकनीतील मुलींसोबत शाहीद कपूरचा वाढदिवस - Marathi News 24taas.com

बिकनीतील मुलींसोबत शाहीद कपूरचा वाढदिवस

www.24taas.com,  मुंबई
 
 
हिंदी चित्रपटातील स्टार कलाकार शाहीद कपूरने आपला वाढदिवस चक्क बिकनी घालतलेल्या मुलींसोबत साजरा केला. त्यासाठी शाहीदने एक पार्टीही आयोजित केली होती. या पार्टीत सर्व प्रकारची पेय होती. त्यामुळे वाढदिवसात आणखी धमाल आल्याची चर्चा आहे.
 
शाहीदने वाढदिवसाची आपली पार्टी गोव्यात ठेवली होती. या पार्टीत धमाल येण्यासाठी जंगी तयारी करण्यात आली होती. सर्व प्रकारची पेय ठेवण्याची दखल घेण्यात आली होती. पार्टीची शोभा काही हिंदी अभिनेत्रींनी वाढविली. पार्टीला खास करून तब्बू आणि शाहीदची मैत्रीण नरगीस फखरी उपस्थित राहिली होती. या दोघींच्या उपस्थित शाहीदने धुंद होऊन आणि बिकनीतील मुलींसोबत आपला जन्मदिवस साजरा केल्याचे वृत्त आहे.
 
 
आता तुम्ही म्हणाल, हे तुम्हला कसं समजलं. शाहीदने आपल्या वाढदिवसाची छायाचित्र काढण्यासाठी खास फोटोग्राफर नेला होता. हीच शाहीदच्या जन्मदिवसाची बातमी लिक करणारी गोष्ट ठरली. कारण याच फोटोग्राफरने चक्क दोन फोटो ट्विटवर टाकले. तेही बिकनी घातलेल्या मुलींसोबत शाहीद आहे.
 
शाहीदची नवी मैत्रीण प्रियंका चोप्राही सहभागी झाली होती. या दोघांनी धमाल करून पार्टी साजरी केल्याचे वृत्त आहे. शाहीदने ३१ वर्षात पदापर्ण केले आहे. मात्र, ३०व्या वर्षाला बाय करताना बिकनीतील मुलींसोबत वाढदिवस साजरा केल्याने हिरोचा कल कुठे आहे, याची चर्चा सुरू आहे, शाहीदला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

First Published: Saturday, February 25, 2012, 13:39


comments powered by Disqus