Last Updated: Saturday, February 25, 2012, 21:22
www.24taas.com, कोल्हपूर 
मल्टिस्टारर मॅटर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. एक्शन, थ्रील आणि रोमान्स याचं मिश्रण या सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतचं कोल्हापूरमध्ये या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करण्यात आलं. या सिनेमात मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील भुमिका साकारली आहे. आता ही सिनेमातील मुख्यमंत्र्यांची भुमिका आव्हांडानी कशी निभावली आहे हे पाहणं मजेशीर ठरणार आहे.
परिस्थितीमुळे गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांच्या मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न मॅटर सिनेमातून केला गेला आहे. रिमांड होममध्ये वाढलेले चार मित्र कसे गुन्हेगार बनतात आणि त्यातून बाहेर पडण्याची इच्छा असतानाही समाजकंटकांकडून त्यांना पुन्हा त्यात विश्वात कसे ढकलले जाते याचं चित्रण मॅटर सिनेमामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सिनेमामध्ये सुशांत शेलार, जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, समीर धर्माधिकारी, मेघा धाडे यांनी प्रमुख भूमिका साकारली.
तसचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील मुख्यमंत्री म्हणून भूमिका साकारली आहे. नुकतचं या सिनेमाच्य़ा टीमने कोल्हापूरमध्ये या सिनेमाचं जोरदार प्रमोशन केलं. या सिनेमामध्ये मेघाने बारगर्लची भूमिका साकारली आहे. आणि ही भूमिका साकारण्यासाठी तिने खूपच मेहनत घेतली आहे. या सिनेमाचा लूक एकदम फ्रेश असल्यामुळे हा सिनेमा हिंदी सिनेमाच्या तोडीचा वाटतो आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना नक्की आवडले असा विश्वास या सिनेमाच्या टीमला वाटतो आहे...
First Published: Saturday, February 25, 2012, 21:22