Last Updated: Sunday, February 26, 2012, 13:11
www.24taas.com 
इम्रान खान आता लवकरच सिंगर इम्रान खान बनून आपल्यासमोर येणार आहे. कारण एका सिनेमासाठी इम्रानने नुकतच पार्श्वगायन केलं आहे. गाता गळा असलेल्या अनेक स्टार्संनी बॉलिवूडमध्ये पार्श्वगायन केलं आहे. अमिताभ बच्चन, हृतिक रोशन, इतकंच कशाला तर खान स्टार्संनीही आपलं गायनकौशल्य सिल्व्हर स्क्रीनवर दाखवलं आहे. शाहरुख खान, आमीर खान, सलमान खान या तीनही खान्सनी पार्श्वगायन करून प्रेक्षकांना खूष केलं आहे.
आता या खानमंडळीमध्ये आणखी एका खानची भर पडते आहे आणि हा खान आहे इम्रान खान. इम्रान लवकरच आपल्या अभिनयासह आपल्या आवाजाची जादू सिल्व्हर स्क्रीनवर दाखवताना दिसणार आहे. विशाल भारद्वाज यांच्या आगामी सिनेमासाठी इम्रानने हे गाणं गायलं आहे. प्रसिध्द गीतकार गुलजार यांनी या गीताची रचना केली आहे. या गाण्याबाबत इम्रान खूपच एक्साईटेड आहे.
गुलजार यांच्या शब्दांसाठी पार्श्वगायन कऱणं खूपच आव्हानात्मक होतं. मात्र विशाल भारद्वाज यांच्या विश्वासामुळेच मी हे करू शकलो असं इम्रानने स्पष्ट केलं आहे. इम्रान या सिनेमामध्ये एका गावरान भूमिकेतून दिसणार आहे आत्तापर्यंत इम्रानने बॉलिवूडमध्ये रोमॅण्टिक भूमिका अधिक केल्यात मात्र या सिनेमातून इम्रान गावरान भूमिकेतून आपल्यासमोर येत असल्यामुळे या सिनेमातून इम्रानचा एक वेगळा लूक आपल्याला पाहायला मिळणार हे नक्की एकूणच सध्या इम्रान आपल्या कलागुणांचे विविध रंग दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे हेच दिसून येते.
First Published: Sunday, February 26, 2012, 13:11