पूनम नव्हे तर बिकीनी पांडे - Marathi News 24taas.com

पूनम नव्हे तर बिकीनी पांडे

www.24taas.com, मुंबई
सनी लिओनच्या आगमनामुळे पूनम पांडेकडे लोकांचं दुर्लक्षच झालं होतं पण गप्प बसली तर ती पूनम कसली. आता पूनमने ट्विटरवर आपले बिकीनीतले फोटो ट्विट केले आहेत. काही दिवसापूर्वी पूनमने एका फोटोला टाकलेल्या कॅप्शनमुळे तस्लिम नसरीन भडकल्या होत्या. आणि त्यानंतर पूनमच्या ट्विटमुळे त्या प्रकरणाने सनसनाटी निर्माण केली होती. अर्थात यामुळे पूनमला काहीच फरक तर पडला नाहीच उलट तिच्या लोकप्रियतेत भरच पडली. पूनम आणि बिकीन असं आता जणू एक नवं समीकरणच तयार झालं आहे.
 
आता तिने आपल्या शरीराचे प्रदर्शन घडवणारे फोटो ट्विट केल्यामुळे आंबट षौकिनांसाठी ती मेजवानीच ठरली आहे. पूनम आपल्या चाहत्यांना धन्यवाद द्यायला विसरली नाही. असे मायबाप चाहते असल्यामुळेच अंगात कोणतीही गुणवत्ता नसताना केवळ शरीरसौष्ठवाच्या भांडवलावर पूनमची चलती आहे. पूनमने आपले नवे फोटो पाहता येतील असं जाहीर आवताण ट्विटद्वारा दिलं आहे. आता सर्च इंजिनवर चाहते तिला बिकीनी पांडे या नावाने शोधतात. नसरीन यांच्यामुळे मार्केट डाऊन झालेल्या पूनमला परत एकदा सुगीचे दिवस आले हे मात्र खरं.
 
 

First Published: Sunday, February 26, 2012, 19:16


comments powered by Disqus