ऑस्कर सोहळा रंगला - Marathi News 24taas.com

ऑस्कर सोहळा रंगला


www.24taas.com, मुंबई
 
८४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या अवॉर्ड सोहळ्यात 'द आर्टिस्ट' आणि 'ह्युगो' सिनेमाने बाजी मारली आहे. ८४ व्या ऑस्कर पुरस्कारवर 'दि आर्टिस्ट' सिनेमाने मोहर उमटवली. तसंच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कारही 'द आर्टिस्ट'साठी मिशेल हॅझेनाव्हिशिअस यांना मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी जॉ दुजॉर्डिनला गौरवण्यात आलं. तर मरील स्ट्रीप यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. मरील यांचा हा तिसरा ऑस्कर आहे.
 
सर्वोत्कृष्ठ सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार ऑक्टेव्हिआला मिळाला आहे. सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ख्रिस्टोफरला मिळाला. तर दुसरीकडे या सोहळ्यामध्ये ‘ह्युगो’ सिनेमाचीही सरशी दिसून आली. ‘ह्युगो’ला पाच पुरस्कार मिळाले. सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शन, एडिटिंग, साऊंड मिक्सिंग, आणि व्हिज्युअल इफेक्टसाठी ‘ह्युगो’ सिनेमाला गौरवण्यात आलं.
 ऑस्कर सोहळ्याचे फोटो पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
बेस्ट ओरिजन स्कोअरसाठी ‘लुडोविक बोर्स’ने ऑस्कर पटकावला. तर बेस्ट एनिमेटेड फिल्मसाठी ‘रँगो’ सिनेमाला ऑस्कर पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं आहे.

First Published: Monday, February 27, 2012, 16:13


comments powered by Disqus