Last Updated: Tuesday, February 28, 2012, 17:41
मुग्धा देशमुख, www.24taas.com, मुंबई अवधूत गुप्तेचा ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. अभिजीत खांडकेकर या सिनेमात प्रमुख भूमिका साकारतोय. सध्या या सिनेमातल्या गाण्याचं शुटिंग सुरु आहे.
आजवर आपल्या सिनेमांना अवधूतने स्वत:च संगीत दिलंय. मात्र, या सिनेमात संगीताची धुरा सांभाळली आहे निलेश मोहरीरने. यातील एक गाणं म्हणजे पोवाडा आणि भांगड्याची जुगलबंदी आहे.
हे गाणं उमेश जाधवने कोरिओग्राफ केलं आहे.नेहमीच काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करणारा दिग्दर्शक अवधूत गुप्तेची ही रोमॅण्टिक कॉमेडी प्रेक्षकांना ‘चक दे फट्टे’ असं म्हणायला लावणार का हे लवकरच कळेल.
First Published: Tuesday, February 28, 2012, 17:41