सीता और गीताची ड्रीम गर्ल... कतरीना - Marathi News 24taas.com

सीता और गीताची ड्रीम गर्ल... कतरीना

www.24taas.com
 
सीता और गीता हा सिनेमा म्हणजे हेमा मालिनीच्या करिअर मधला मैलाचा दगड. सोशिक सीता आणि चलाख गीता या दोन्ही भूमिका हेमामालिनींनं अगदी चपखल वठवल्या. संजीव कुमार आणि धर्मेंद्र यांच्यासह तिचं जमलेलं ट्युनिंग त्यावेळी प्रेक्षकांना भलतच आवडलं. आजंही हा सिनेमा  पाहणं म्हणजे धमाल एक्सपिरिअन्स. हं हाच धमाल अनुभव पुन्हा एकदा नव्या पिढीला पहाता येणार आहे. मात्र नव्या अंदाजात.
 
सीता और गीताचा रिमेक लवकरच येणार आहे. सिनेमाच्या मालकी हक्कांवरुन बराच वाद झाला होता मात्र आता सिनेमाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता नव्या सीता ओर गीतामध्ये कोण झळकणार याची उत्सुकता तुम्हालाही असणारच. सीता और गीताची लिडींग लेडी आहे कतरिना कैफ. होय... कतरिना आपल्याला पहिल्यांदाच सीता और गीतामध्य डबल रोल करताना दिसेल. सोज्वळ सीता आणि अवखळ गीता ती बिग स्क्रीनवर रंगवण्याची संधी कॅटला मिळाली आहे.
 
अर्थात हाच तिचा ड्रीमरोल आहे त्यामुळे कतरिना खूपच एक्साईटेड आहे. आता संजीव कुमार आणि धर्मेंद्रच्या भूमिका नव्या सीता और गीता मध्ये कोम वठवणार हाही प्रश्न आहेच. तर यासाठी अक्षय कुमार आणि बॉबी देओल या सिनेमाच्या रिमेकमध्ये आपल्याला दिसणार आहेत. तेव्हा नव्या अंदाजात येणाऱ्या ग्लॅमरस सीता और गीतासाठी सज्ज व्हा..
 
 
 

First Published: Wednesday, February 29, 2012, 08:26


comments powered by Disqus