कोकेनप्रकरणातून फरदीनची सुटका - Marathi News 24taas.com

कोकेनप्रकरणातून फरदीनची सुटका

www.24taas.com,  मुंबई
 
 
प्रदीर्घ कालावधीनंतर अभिनेता फरदीन खान याची कोकेनप्रकरणातून सत्र न्यायालयाने बुधवारी  सुटका केली. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फरदीनविरुद्ध सेवन करण्याच्या उद्देशाने  एक ग्रॅम कोकेन बाळगल्याचा आरोप निश्चित करण्यात आला होता.
 
 
व्यसनमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र सादर करून त्या पाश्र्वभूमीवर आपल्यावरील सर्व आरोप मागे घेण्याची फरदीनची विनंती विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप मान्य केली. परंतु भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्य़ात फरदीन अडकला, तर त्याच्यावरील आरोप मागे घेऊन केलेल्या त्याच्या सुटकेचा निर्णय रद्द केला जाईल, असेही न्यायालयाने या वेळी नमूद केले आहे.
 
 
कोकेन बाळगल्याच्या आरोपानंतर  फरदीनने शासकीय रुग्णालयातील व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतले. तसेच त्याबाबतचे प्रमाणपत्र न्यायालयात सादर करून त्या पाश्र्वभूमीवर आपल्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात यावेत, अशी मागणी केली होती. सुनावणीसाठी फरदीन स्वत: न्यायालयात  उपस्थित होता.

First Published: Thursday, March 1, 2012, 11:23


comments powered by Disqus