ती तर कबड्डीसाठीही 'नग्न' होईल! - Marathi News 24taas.com

ती तर कबड्डीसाठीही 'नग्न' होईल!

www.24taas.com, मुंबई
 
तस्लिमा नसरीन यांच्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगनेही पूनम पांडेच्या सतत चर्चेत राहाण्यावर टीका केली आहे. चित्रांगदा सिंगने ट्विटरवर ट्विट केलं की, पूनम पांडेशी आपण कशी काय स्पर्धा करणार? ती तर कबड्डी मॅचसाठीपण आपले सगळे कपडे उतरवायला तयार असते.
 
पूनम आणि चित्रांगदा यांच्यातील वाद तसा जुनाच आहे. चित्रांगदाने खूप मोठे नाही, पण आपलं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’मधील तिच्या भूमिकेसाठी प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवाही मिळवली होती. ‘ये साली जिंदगी’मधील तिची भूमिकाही चांगलीच गाजली. नुकतीच ती ‘देसी बॉइज’ सिनेमात अक्षय कुमारबरोबर दिसली होती. पण, पूनम पांडेला अद्याप एकही सिनेमा मिळालेला नाही. लोकप्रियतेसाठी तिने वाह्यात वक्तव्य आणि टॉपलेस फोटोंची खैरात केली. ट्विटरवर तिचे फोटो बरेच वादग्रस्त ठरले आहेत.
 
यापूर्वी तस्लिमा नसरीन या स्त्रीवादी लेखिकेनेही पूनम पांडेच्या फोटोंवर आणि वक्तव्यांवर तिखट प्रतिक्रिया दिली होती. मात्र, यावर आणखीनच वाह्यात शब्दांत पूनमने तस्लिमा नसरीन यांना उत्तर दिले होते. चित्रांगदाच्या ट्विटवर पूनमने अजून तरी काही प्रतिक्रिया दिली नसली, तरी जेव्हा ती आता यावर काय उत्तर देणार याचीच सगळ्यांना उत्सुकता आहे.
 

First Published: Saturday, March 3, 2012, 17:25


comments powered by Disqus