रितेश-जेनेलियाचं देवदर्शन, तुळजापुरात 'गोंधळ'! - Marathi News 24taas.com

रितेश-जेनेलियाचं देवदर्शन, तुळजापुरात 'गोंधळ'!

www.24taas.com, तूळजापूर
 
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख यांच्या कुटुंबीयांनी तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात जागरण गोंधळ विधी केले. त्यांची मुलं रितेश आणि धीरज या दोघांचे विवाह नुकतेच पार पडले.
 
रितेशचा अभिनेत्री जेनेलियाशी तर धीरजचा दीपशिखा वाशू भगनानी हिच्याशी विवाह झाला. त्यामुळे मराठी परंपरेनुसार कुलदैवताला जाऊन संपूर्ण देशमुख कुटुंबीयांनी जागरण आणि गोंधळ विधी पार पाडले.
 
संबळच्या गजरात आणि स्थानिक आणि गोंधळी पुजाऱ्यांनी ही पूजा केली. या सोहळ्याला डिसूझा आणि भगनानी कुटुंबीय देखील हजर होते. हा धार्मिक विधी पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती.
 
 
 
 
 
 

First Published: Monday, March 5, 2012, 17:15


comments powered by Disqus