'चित्रांगदा कधीही पूनम पांडे होऊ शकत नाही' - Marathi News 24taas.com

'चित्रांगदा कधीही पूनम पांडे होऊ शकत नाही'

www.24taas.com, मुंबई
 
आपल्या मादक अदांनी सगळ्यांनाच घायाळ करणाऱ्या आणि त्यामुळे सतत चर्चेत राहणाऱ्या मॉडेल पूनम पांडेनी ट्विटरवर आपल्या विरूद्ध बोलणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. तस्लिमा नसरीनच्या टिप्पणी नंतर आता चित्रांगदा सिंह हिला देखील सणसणीत उत्तर दिलं आहे. पूनमने ट्विट केलं आहे, की ती (चित्रांगदा) भुकंते आहे.
 
आपल्या ट्विटमध्ये पूनमने लिहले कि मी आज खूप खूश आहे. की लोक माझं नाव घेऊन पब्लिसिटी मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसचं गुरू फिल्मचा डायलॉग तिने लिहला. जेव्हा लोक तुमच्या विरूद्ध बोलतात तेव्हा असं समजा की, तुमची प्रगती होत आहे.  तसचं चित्रांगदाला आव्हान दिलं आहे की, माझ्यावर कितीही जळण्याचा प्रयत्न केला तरीही तु कधीही पूनम पांडे बनू शकत नाही.
 
बॉलीवूड नायिका चिंत्रांगदाने नेहमीच चर्चेत राहणाऱ्या मॉडल पूनम पांडेवर निशाणा साधला आहे. चित्रांगदाने ट्विटरवर ट्विट केलं की,  पूनम पांडे विरूद्ध कोण उभं राहू शकतं, ती कबड्डींसाठीही तीचे कपडे उतरविण्यास तयार होईल.
 
 
 
 

First Published: Monday, March 5, 2012, 22:17


comments powered by Disqus