आणखी एक माधुरी दीक्षित! - Marathi News 24taas.com

आणखी एक माधुरी दीक्षित!

www.24taas.com, लंडन
 
बॉलिवूडसकट सर्व मराठी मनांसाठी खूशखबर! बॉलिवूडची प्रख्यात ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित-नेने हिच्या मेणाच्या पुतळ्याचे अखेर बुधवारी लंडनच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये अनावरण झाले. माधुरीचे तमाम फॅन्स या दिवसाची वाट पाहात होते.
 
मादाम तुसाँमध्ये या आधी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, हृतिक रोशन णि ऐश्वर्या राय बच्चन यांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. आता या पुतळ्यांमध्ये माधुरी दीक्षितही दाखल झाली आहे.
 
माधुरी दीक्षितची अदाकारी तेजाब, राम लखन, बेटा, हम आपके है कौन, दिल तो पागल है, देवदास यांसारख्या अनेक सिनेमांत प्रेक्षकांनी अनुभवली आहे. तिच्या हास्याचे कोट्यावधी चाहते आहेत.
 
अमेरिकास्थित डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करून माधुरी डेनव्हर येथे स्थायिक झाली होती. काही महिन्यांपूर्वीच माधुरी मुंबईत परतली आहे. झलक दिखला जा-५ मध्ये तिचं मोहक दर्शन घडलं होतं. सध्या माधुरी एक टीव्ही वाहिनीची ब्रँड अँबेसॅडर आहे.

First Published: Thursday, March 8, 2012, 16:19


comments powered by Disqus