अभिनेता जॉय मुखर्जी यांचे निधन - Marathi News 24taas.com

अभिनेता जॉय मुखर्जी यांचे निधन

www.24taas.com, मुंबई
 
जुन्या सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता जॉय मुखर्जी यांचे आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये निधन झाले. हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाला. जॉय यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे सोमवारी लीलावती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं.
 
जॉय यांची प्रकृती आणखी गंभीर झाल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. ते ७३ वर्षांचे होते.
 
जॉय मुखर्जींनी १९६० साली लव्ह इन शिमला या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यांचे लव्ह इन टोकियो,शागिर्द, बहू बेटी, जिद्दी, फिर वही दिल लाया हूं, एक मुसाफिर एक हसीना, पुरस्कार, इशारा, हम हिंदुस्तानी हे चित्रपट विशेष गाजले होते. जॉय मुखर्जी यांच्या निधनाने सिनेसृष्टीमध्ये शोकाकुल वातावरण आहे.
 

First Published: Friday, March 9, 2012, 15:20


comments powered by Disqus