पधारो राणाजी - Marathi News 24taas.com

पधारो राणाजी

झी २४ तास वेब टीम, मुंबई
एकेकाळी बिपाशा बसू आणि जॉन अब्राहम हे बॉलिवूडमधले हॉट लव्हबर्डस होते. त्यानंतर त्यांच्यात बिनसलं आता असं बॉलिवूडमध्ये होतचं त्यात विशेष असं काही नाही. काही दिवस बिपाशा सिंगल आणि रेडी टू मिंगल असताना तिच्या आयुष्यात शाहिदने एण्ट्री मारली आणि तितक्याच वेगाने एक्झिटही घेतली.  या रिलेशनच्या कवडट आठवणीनंतर बिपाशाने तिचा दम मारो दममधला कोस्टार राणा दुग्गबटीशी सूत जुळवलं. बिपाशा तरी काय करणार बिचारी एकाकीपणावरचा उपाय म्हणून शोधला तिने नवा बॉयफ्रेंड.  पण आता आग दोन तरफ लगी है. बॉम्बे टाइम्सच्या ऍनिवर्सरी बॅशला बिपाशाला हजेरी लावायची होती आणि त्यासाठी राणा खास मुंबईत दाखल झाला. बॅशला बिपाशाला एकट्याला जायचं नव्हतं कारण तिथे जॉन आणि शाहिदही हजेरी लावणार होते. राणा त्यासाठी आपलं काम सोडून हैदराबादहून मुंबईला आला आणि दुसऱ्या दिवशी परत शुटसाठी परतला. बिपाशाला विचारलं बाई गं राणाला एवढ्यासाठी कशाला त्रास दिला तरी ती फणकारली आणि म्हणाली की मी कशाला त्याला बोलावू आता बोला.

First Published: Thursday, November 10, 2011, 12:56


comments powered by Disqus