Last Updated: Sunday, March 11, 2012, 22:11
www.24taas.com 
बॉलिवूडचा चॉकलेट बॉय इम्रान खान आता पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीनवर नेगेटिव्ह भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. 'वन्स अपॉन टाईम इन मुंबई' या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये इम्रान डॉनची भूमिका साकारतो आहे.
'वन्स अपॉन टाईम इन मुंबई' या सिनेमातून ७० च्या दशकातील दहशतीचं चित्रण आपल्याला सिल्व्हर स्क्रीनवर दिसेल. या सिनेमातील अजय देवगण आणि इम्रान हाश्मी यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली. आता अशीच केमेस्ट्री या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये दिसावी यासाठी या सिनेमाची टीम प्रयत्नशील आहे. त्यामुळे या सिनेमाच्या सिक्वेलसाठी आता अक्षय कुमारसह इम्रान खानच्या नावावकरही शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
इम्रान या सिनेमात एका डॉनची भूमिका साकारतो आहे. मात्र ही भूमिका छोटा शकील किंवा छोटा राजनवर आधारित नसल्याचा खुलासा या सिनेमाच्या टीमने केला आहे. तसंच या सिनेमाचं वैशिष्टय म्हणजे या सिनेमात अक्षय कुमार आणि इम्रान खान ही जोडी पहिल्यांदाच सिल्व्हर स्क्रीनवर एकत्र दिसणारे आहे.
इम्रानने याआधी किडनॅप सिनेमातून नकारात्मक भूमिका सिल्व्हर स्क्रीनवर साकारली आहे. मात्र त्याच्या करीअरचा ग्राफ पाहता त्याने आजवर चॉकलेट बॉयच्या भूमिकाच अधिक केल्यात त्यामुळे हा डॉन इम्रान सिल्व्हर स्क्रीनवर कसा साकारतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
First Published: Sunday, March 11, 2012, 22:11