सलमानसोबत परत काम करण्याचं स्वप्न- सुरज - Marathi News 24taas.com

सलमानसोबत परत काम करण्याचं स्वप्न- सुरज

www.24taas.com, मुंबई
सलमान खानबरोबर परत एकदा काम करण्याचं स्वप्न असल्याचं सुरज बडजात्याने म्हटलं आहे. सुरज बडजात्याने दिग्दर्शित केलेला विवाह सहा वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता, त्यानंतर त्याने एकाही सिनेमाचे दिग्दर्शन केलेलं नाही.
 
सुरज बडजात्याने १९८९ साली मैने प्यार कियाच्या दिगदर्शनाद्वारे बॉलिवूनडमध्ये पदार्पण केलं होतं. सलमान खान आणि भाग्यश्री अशी फ्रेश जोडी असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला होता. त्यानंतर पाच वर्षांनी सलमान खान आणि माधुरी दिक्षीत जोडीचा सुरज बडजात्याने दिग्दर्शित केलेल्या हम आपके है कौन या सिनेमाने इतिहास घडवला. हम आपके है कौनने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कलेक्शन केलं होतं. त्यानंतर सलमानचीच भूमिका असलेला हम साथ साथ है हा देखील हिट झाला होता.
 
सुरज बडजात्याचे त्यानंतर दिग्दर्शित केलेला मै प्रेम की दिवानी हूँ प्लॅप झाला होता. तर शाहिद कपूर आणि अमृता राव या जोडीचा विवाह हिट ठरला होता. सुरजने दिग्दर्शित केलेल्या सर्व सिनेमात नायकाचे नाव प्रेम कायम राहिलं आहे.
 
 
सुरजने नुकतंच एक पटकथा लिहून पूर्ण केली असून लवकरच त्या सिनेमाचे शुटिंग सुरु होईल. सलमानसोबत परत एकदा काम करण्याचं आपलं स्वप्न असल्याचं सुरजने पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
 

First Published: Monday, March 12, 2012, 14:08


comments powered by Disqus