दबंग 2 मध्ये प्रतिक्षा 'पांडेजी मारे सिटी'ची.... - Marathi News 24taas.com

दबंग 2 मध्ये प्रतिक्षा 'पांडेजी मारे सिटी'ची....

www.24taas.com, मुंबई
दबंगमधल्या सलमान खानने साकारलेल्या चुलबुल पांडेची व्यक्तिरेखेने नवा ट्रेंड रुजवला. चुलबुल पांडे ही व्यक्तिरेखा त्याच्या रुबाबदार मिश्या, फॉर्मल शर्ट्स आणि कॉलरच्या मागे लटकवलेल्या गॉगलमुळे प्रेक्षकांवर छा गयी असंच म्हटलं पाहिजे. सलमानवर फिदा असणाऱ्या प्रेक्षकवर्गाची अचूक नाडी पकडणारी ही व्यक्तिरेखा होती त्यामुळे ती विलक्षण गाजली आणि तिचं अनुकरणही मोठ्या प्रमाणावर झालं.
 
दबंगमधल्या मलाईका अरोरा खानसोबत 'मुन्नी बदनाम हुई' या गाण्यावर सलमानच्या परफॉर्मन्सने पब्लिकला वेडं करुन सोडलं. आता त्याचीच पुनरावृत्ती दबंग 2 मध्ये होणार आहे. आता यात एका धमाकेदार गाण्यावर करिना कपूर आयटन नंबर सादर करणार आहेच.
 
पण 'पांडेजी मारे सिटी' या आणखी एका गाण्यावर परत एकदा भाभी जान मलाईका अरोरा खानसोबत सलमान खान आपल्या अदाकारीने चार चाँद लावणार आहे. त्यामुळे सलमान दबंग खानच्या चाहत्यांना डबल ट्रीटची मजा घेता येणार आहे.
 
 
 

First Published: Tuesday, March 13, 2012, 16:08


comments powered by Disqus