‘सन ऑफ सरदार’च्या सेटवर लाइटमनचा मृत्यू - Marathi News 24taas.com

‘सन ऑफ सरदार’च्या सेटवर लाइटमनचा मृत्यू

www.24taas.com, पटियाळा


 


अजय देवगणच्या आगामी 'सन ऑफ सरदार' या सिनेमाच्या सेटवर लाइटमनचा मृत्यू झाला. मिळालेल्या वृत्तानुसार  लाइटमन मच्छिंद्र अरवेळ (बाळा) याचा विजेचा धक्का लागून जागच्या जागीच मृत्यू झाला. या वेळी त्याच्यासोबत असणारा बिपीन यादव हा सध्या  ‘आयसीयू’मध्ये उपचार घेत आहे. पंजाबमधील पटियाळा येथे सन ऑफ सरदार या सिनेमाचं शुटींग सुरू असताना ही दुर्घटना घडली.


 


युनियनचे उपाध्यक्ष प्रेम सिंग ठाकूर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अजय देवगण आणि मुकूल देव यांच्या चेहऱ्यावर लाइट यावा यासाठी वायर नीट  लावत असताना बाळाच्या अंगाचा स्पर्श पब्लिक वर्क्सच्या ओव्हरहेड वायरला झाला. या वायरमधून ११,००० व्होल्ट्स इतकी वीज पास होत असल्यामुळे या विजेच्या झटक्याने बाळा जागच्या जागीच मरण पावला.


 


बाळाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करताना अजय देवगणने ट्विट केलं, “आज आम्ही आमच्या टीममधील एक माणूस गमावला. आजचा दिवस खूप वाईट गेला. मी याबद्दल शोक व्यक्त करतो आणि बाकी आमच्या टीमसाठी हा खूप मोठा धक्का होता.”


 


सिनेमातील अजय देवगण, संजय दत्त, जुही चावला आणि इतर कलाकार यांनी मृत पावलेल्या ३० वर्षीय बाळाच्या कुटुंबाला ३० लाख रुपयांची मदत देण्यचं ठरवलं आहे. थिवाय पुन्हा शुटींग सुरू करण्यापूर्वी संपूर्ण युनिट एक पूजा करून घेणार आहे.


 


First Published: Wednesday, March 14, 2012, 10:49


comments powered by Disqus