Last Updated: Friday, March 16, 2012, 08:37
www.24taas.com, मुंबई 
सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी ज्येष्ठ अभिनेत्री साधना यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आशा भोसलेंचा आरोप आहे की साधना त्यांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेऊन तपास सुरु केला आहे.
अभिनेत्री साधना पुन्हा एकदा पोलीस चौकशीच्या फेऱ्यात सापडल्या आहेत. साधनावर आरोप आहे जमीन हडपल्याचा. साधना विरोधात ही तक्रार दाखल केली आहे प्रसिद्ध गायिका आसा भोसले यांनी. आशा यांचा आरोप आहे की साधना त्यांची सांताक्रूज येथील बंगल्याची जमीन हडप करण्याचा प्रयत्न करत आहेत.
साधना सध्या ज्या बंगल्यामध्ये राहते आहे ती आशा भोसले यांची प्रॉपर्टी असल्याचं सांगण्यात येतं आहे. आशा भोसले यांचा आरोप आहे की साधनाने बंगल्याच्या रिकाम्या जमिनीवर बगीचा बनवून त्यावर कब्जा केला आहे.
साधना ज्या संगीत बंगल्यात राहते तिथे आणखी दोन भाडेकरु राहतात. त्यातला एक युसुफ लकडावाला आहे. ज्याच्या विरोधात साधनाने जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. जो खोटा असल्याचं स्पष्ट झालं होतं. मात्र त्या प्रकरणात जरी साधनाला दिलासा मिळाला असला तरी या नविन आरोपांमुळे साधनासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आमच्या प्रतिनीधीने जेव्हा याविषयी चर्चा कऱण्यासाठी साधनाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तेव्हा साधनाने कॅमेरासमोर यायला नकार दिला.
First Published: Friday, March 16, 2012, 08:37