आमीरला सलमानच्या लग्नाचे वेध - Marathi News 24taas.com

आमीरला सलमानच्या लग्नाचे वेध

www.24taas.com, मुंबई
 
सलमानच्या लग्नाची तमाम सिनेमाप्रेमींना उत्सुकता आहे, तशीच आमीर खानलाही आहे. सलमानने लवकरात लवकर लग्न करावं अशी आमीरची इच्छा आहे. सलमान खानचा जवळचा मित्र असणारा ‘एस’ खान आमीरलाही सलमानच्या लग्नाचे वेध लागले आहेत. सलमानने लवकरात लवकर लग्न करावं, अशी इच्छा आमीरने व्यक्त केली आहे.
 
१४ मार्चला आपल्या वाढदिवसानिमित्त एका दैनिकाशी बोलताना आमीरने सलमानच्या लग्नाचा विषय काढला. “सलमानने लवकरात लवकर लग्न करावं असं मला वाटतं. त्याच्या अवतीभोवती बऱ्याच सुंदर म२त्रिणी घोटळत असतात. त्यातलीच एखादी चांगली मुलगी निवडून त्याने लग्न करावं असं मला वाटतं.”
 
४६ वर्षांचा ‘दबंग’ खान सलमान अजूनही देशातील मोस्ट एलिजिबल बॅचलर मानला जातो. दिवसागणिक लाखोंनी त्याला लग्नाच्या ऑफर्स येत असतात. बॉक्स ऑफिसवर यशाची वेगवेगळी शिखरं सर करत असला, तरी सलमानला आद्याप त्याची जीवनसाथी मिळालेली नाही. पण, आता ‘अंदाज अपना अपना’तल्याच ‘अमर’ने ‘प्रेम’कडे लग्नाचा आग्रह धरल्यावर सलमानला आता लग्नासाठी ‘रेडी’ व्हावंच लागणार आहे.

First Published: Friday, March 16, 2012, 08:43


comments powered by Disqus