प्रतिक दाखवणार बेडकुल्या - Marathi News 24taas.com

प्रतिक दाखवणार बेडकुल्या

झी २४ तास वेब टीम,मुंबई 
अमिर, शाहरुख आणि सलमान खान यांच्या नंतर आता धोबीघाटमधील कलाकार प्रतीक आता त्याच्या पुढच्या सिनेमात इशकमध्ये सिक्स पॅक ऍब म्हणजे आपल्या शरिर सौष्ठावाचं दर्शन घडवणार आहे. शेक्सिपिअरच्या रोमिओ अँड ज्लुलिएट या अजरामर कलाकृतीवर आधारीत या सिनेमासाठी प्रतिक प्रचंड मेहनत घेत आहे. यात तो एका बनारसी मुलाची भूमिका साकारणार आहे.
मी पहिल्यांदाच बनारसच्या देशी रोमिओची भूमिका साकारणार असल्याचं तसंच प्रत्यक्ष आयुष्यात मी जसा आहे त्याहून सर्वस्वी वेगळी अशी भूमिका असल्याचं प्रतिकने म्हटलं आहे. भूमिका जीवंत करण्यासाठी भाषेचा लहेजा शिकण्याबरोबच मी रोज दोन तास जीममध्ये मेहनत घेत असल्याचंही प्रतिकचं म्हणणं आहे. आता ही सर्व वाक्य तुमचीही तोंडपाठी झाली असतीलच नाही का? माझ्या कारकिर्दीतला हा सर्वात चांगला कालखंड आहे आणि प्रत्येक सिनेमा हे माझ्यासाठी नवं आव्हान असतं असंही प्रतिक म्हणाला आहे.
 
सिनेमाचा दिग्दर्शक मनिषने मीच या भूमिकेला न्याय देऊ शकतं आणि मग मी हा सिनेमा स्विकारल्याचं प्रतिकने सांगितलं. आता आजवरची प्रतिकची कारकिर्द पाहिली तर याला प्रचंड आत्मविश्वास म्हणावा कि फाजील आत्मविश्वास याचा निर्णय तुम्हीच करा?

First Published: Sunday, November 13, 2011, 14:52


comments powered by Disqus