कतरिना करणार अमिताभबरोबर रोमान्स? - Marathi News 24taas.com

कतरिना करणार अमिताभबरोबर रोमान्स?

www.24taas.com, मुंबई
 
निखिल अडवाणीच्या आगामी ‘मेहरुन्निसा’ या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या नायिकेच्या भूमिकेत कतरिना कैफ दिसण्याची शक्यता आहे. या आगळ्यावेगळ्या सिनेमात कतरिनाला अमिताभ बच्चन यांच्याशी रोमान्स करायचा आहे.
 
कल हो ना हो, सलाम-ए-इश्क, पटियाला हाऊस यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या निखिल अडवाणीच्या आगामी सिनेमात कतरिनाला वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारची भूमिका तिने यापूर्वी कधीही केलेली नाही. निखिल अडवाणीने स्वतः कतरिनाला या भूमिकेसाठी गळ घातली आहे. या सिनेमात कतरिनाला २० वर्षांच्या मुलीपासून ते ६० वर्षांच्या वृद्धेपर्य़ंतची आयुष्यातील स्थित्यंतरं साकारायची आहेत. त्यामुळे कतरिनासाठी ही भूमिका आव्हानात्मक असणार आहे.
 
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निखिल कतरिनाला मेहरुन्निसाचं कथानक ऐकवायला लंडनला गेला आहे. याच भूमिकेसाठी विद्या बालनलाही विचारणा करण्यात आली आहे. बूम आणि सरकार या सिनेमांत अमिताभ आणि कतरिना नी एकत्र काम केलं आहे, मात्र कतरिना कधीही अमिताभ यांच्या नायिकेच्या भूमिकेत दिसलेली नाही. त्यामुळे कतरिना आणि अमिताभ अशी जोडी पाहाणं प्रेक्षकांनाही वेगळंच वाटेल.

First Published: Tuesday, March 20, 2012, 10:42


comments powered by Disqus