जंजीरच्या रिमेकमध्ये प्रियांकाचा लीड रोल - Marathi News 24taas.com

जंजीरच्या रिमेकमध्ये प्रियांकाचा लीड रोल

www.24taas.com, मुंबई
 
बॉलिवूडमध्ये १९७३ साली प्रदर्शित झालेल्या झंझीरने इतिहास घडवला. अमिताभ बच्चन आणि प्राणच्या अभिनयाच्या जुगलबंदीने या सिनेमाला वेगळचं परिमाण लाभलं. जया बच्चननेही आपली भूमिका ताकदीने साकारली होती.
 
आता अपूर्व लखिया या सिनेमाचा रिमेक दिग्दर्शित करणार आहे. त्यात जया बच्चनची भूमिका प्रियांका चोप्रा साकारणार आहे. प्रियांकाला फिल्म इंडस्ट्रीतल्या तगड्या लॉबीने साईडलाईन केल्याच्या अफवांनी जोर धरला असतानाच ही बातमी आल्याने त्यात तथ्य नसल्याचं उघड झालं आहे.
 
नव्या युगातला जंजीरला ऑईल माफियांची पार्श्वभूमी असणार आहे. प्रियांकाला या भूमिकेसाठी तब्बल अकरा कोटी रुपये देण्यात आल्याची चर्चा आहे. या सिनेमाची निर्मिती प्रकाश मेहरांचा मुलगा अमित मेहरा आणि रिलायन्स एन्टरटेनमेंट करणार असून १३ एप्रिलपासून फिल्म सिटीत शुटिंगला सुरुवात होणार आहे.
 
प्रियांकाची आणि निर्मात्यांची भेट झाली असून ती लवकरच होकार कळवणार असल्याचं समजतं. या सिनेमात ती एनआरआय कॅफे मालकिणीची भूमिका साकारणार आहे. अमिताभ बच्चनच्या तीन रिमेक डॉन, अग्निपथ आणि आता जंजीरसाठी प्रियांकाला विचारण्यात आलं हा मोठा योगायोग असल्याचं तिच्या मैत्रिणीने सांगितलं.
 
 

First Published: Wednesday, March 21, 2012, 17:25


comments powered by Disqus