Last Updated: Thursday, March 22, 2012, 17:53
www.24taas.com, मुग्धा देशमुख-मुंबई तुकाराम या सिनेमाच्या फर्स्ट लूकला तुकाराम मात्र गैरहजर होते...अहो म्हणजे, तुकारामांची भूमिका साकारणारा जितेंद्र जोशी याच्यासह यावेळी सिनेमाचे कलाकार कुठेच दिसले नाहीत.
मराठी कलाकार आजकाल खूपच व्यस्त दिसतायत बहुधा...नाही नाही ते अनेक सिनेमांमध्ये झळकतात म्हणून आम्ही असं म्हणत नाही आहोत तर त्यांच्या व्यस्त वेळापत्रकात त्यांना स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनलादेखील वेळ मिळत नाही असं दिसतंय...याचा प्रत्यय आला तुकाराम सिनेमाच्या फर्स्ट लूकच्या वेळी...यावेळी या सिनेमातील प्रमुख कलाकार इथे दिसलेच नाहीत ...तर दिसले फक्त दिग्दर्शक आणि निर्माते.
तुकाराम या सिनेमात जितेंद्र जोशी तुकारामाची भूमिका साकारतोय..त्यामुळे या कार्यक्रमाला जितेंद्र हजर असणं खरंतर अपेक्षित होतं..मात्र तुकाराम साकारणारा जितेंद्र इथे उपस्थितच नव्हता...याचं कारण आम्ही दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना विचारलं. पण या दोघांकडेही प्रश्नांचं उत्तर नव्हतं. सिनेमाच्या निर्मात्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि वेळ मारून नेली.एखाददुसरा अपवाद वगळता तुकाराममधील कुठलाच कलाकार इथे हजर नव्हता.
मराठी सिनेमा जर लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्यासाठी प्रमोशन आवश्यक आहे आणि प्रमोशनला हजेरी लावणं हे ओघानंच आलं..पण मराठी कलाकारांना याचं महत्व पटलेलं दिसत नाही ..तुकाराममधील कलाकारांची यावेळी असलेली अनुपस्थिती हेच दर्शवते.
First Published: Thursday, March 22, 2012, 17:53