Last Updated: Friday, March 23, 2012, 10:44
www.24taas.com, मुंबई मराठी कलाकारांनीही नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच गुढीपाडव्याचं स्वागत केलं. कलाकारांच्या चिरायू या कार्यक्रमाला इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
मराठी सेलिब्रिटींनी एकत्र येत गुढीपाडव्याचं असं जल्लोषात स्वागत केले. मराठी कलाकारांनी स्थापलेल्या रंगकर्मी या संस्थेतर्फे चिरायू या कार्यक्रमाचं गुढीपाडव्यानिमित्त आयोजन करण्यात आलं. यावेळी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आवर्जून उपस्थित होते. चिरायू ही संकल्पना ब-याच वर्षांपूर्वी विनय आपटेंसह काही कलाकारांनी सुरू केली होती. मात्र, काही काळानंतर हा सोहळा बंद करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा एकदा चिरायूच्या सेलिब्रेशनकडे पाहून विनय आपटेंना जूने दिवस आठवले.
भारतीय पारंपरिक वेशभूषा असा चिरायू पार्टीचा खास ड्रेसकोड ठेवण्यात आला होता. मात्र, पुरुष कलाकारांनी हा ड्रेसकोड पाळलेला दिसून आला नाही. मात्र त्याउलट स्त्री कलाकारांनी खास पारंपरिक वेशभूषेत हजेरी लावली. खास गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या या खास कार्यक्रमातला जल्लोष, मजामस्ती, आणि उत्साहानं उत्तरोत्तर रंग भरले.
First Published: Friday, March 23, 2012, 10:44