Last Updated: Saturday, March 24, 2012, 16:28
www.24taas.com, दुबई बॉलिवूड अभिनेत्री सेलिना जेटलीने आज दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. सेलिना आणि तिचा नवरा पीटर हॉग यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावं विंस्टन आणि विराज अशी ठेवली आहेत.
आम्ही खूप खूश आहोत. सेलिना आणि दोन्ही मुलांची प्रकृती उत्तम आहे. सर्वांनी आमच्या मुलांना आशीर्वाद द्यावेत, एवढीच आमची इच्छा आहे. असं पीटर हॉग याने सांगितलं. सेलिना आणि दोन्ही मुलं लवकरात लवकर घरी यावीत याची पीटर वाट पाहात आहे.
३० वर्षीय सेलिना जेटली ही माजी मिस इंडिया आहे. गेल्या वर्षी तिने अचानक आणि फारसा गाजावाजा न करता दुबईस्थित ऑस्ट्रियन बिझनेसमन पीटर हॉगशी लग्न केलं होतं. सध्या दुबई येथे वास्तव्य असणारं हे जोडपं लवकरच पुन्हा मुंबईत येण्यासंबंधी विचार करत आहे.
फिरोझ खान यांच्या ‘जानशीन’ या सिनेमातून सिनेमात प्रवेश केलेल्या सेलिनाने ‘सेक्स सिंबॉल’ म्हणून नाव कमावले असले, तरी बॉलिवूडने दखल घ्यावी अशी कुठलीही विशेष भूमिका केलेली नाही. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘थँक यू’ या सिनेमात ती दिसली होती.
First Published: Saturday, March 24, 2012, 16:28