नेहा पेंडसे 'स्ट्रगलर अभिनेत्री'च्या भूमिकेत - Marathi News 24taas.com

नेहा पेंडसे 'स्ट्रगलर अभिनेत्री'च्या भूमिकेत

www.24taas.com, प्रशांत अनासपुरे, मुंबई
 
मराठी इंडस्ट्रीतील ग्लॅमगर्ल अर्थात नेहा पेंडसे आता लवकरच 'स्ट्रगलर अभिनेत्री'च्या भूमिकेत दिसणार आहे. 'गुलाम बेगम बादशहा' हा सस्पेन्स थ्रीलर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 




'गुलाम बेगम बादशहा'चं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे भरत जाधव आणि संजय नार्वेकर ही सुपरहिट जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. नाशिकमध्ये या सिनेमाचं सध्या शूटिंग सुरू आहे. एका बंगल्यात राहणा-या तीन मित्रांची ही कथा आहे. नेहा एका स्ट्रगलर अभिनेत्रीचा रोल साकारतेय. तर भरत जाधव एका पॅथॉलॉजीमध्ये काम करणारा होतकरू तरुण आहे, की ज्याचं स्वतःच्या मालकीची लॅब सुरू करण्याचं स्वप्न असतं.

तर संजय नार्वेकर एका जाहिरात कंपनीत काम करणारा धडपडा तरूण... या तिघांच्या घट्ट मैत्रीत पैशांवरून होणारी भांडणं कशी अडचण निर्माण करतात, हे या सिनेमात पहायला मिळणार आहे. याव्यतिरिक्त विजय कदम, विघ्नेश जोशीही महत्वाच्या भूमिकेत असणार आहेत. राजू फिरके दिग्दर्शित या सिनेमाचं संगीत अशोक पत्की यांनी दिलंय. आपल्या दिलखेचक अदांनी आणि डान्सने चाहत्यांना थिरकवणारी नेहा पेंडसे या सिनेमातून एका हटके रोलमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही स्ट्रगलर अभिनेत्री कशी असणार याची तिच्या चाहत्यांना नक्कीच उत्सुकता असणार.

First Published: Sunday, March 25, 2012, 18:44


comments powered by Disqus