तणावमुक्तीसाठी मी सेक्स करते- काश्मिरा - Marathi News 24taas.com

तणावमुक्तीसाठी मी सेक्स करते- काश्मिरा

www.24taas.com, मुंबई
 
बॉलीवुडची अभिनेत्री काश्मिरा शाहने एक बिनधास्त वक्तव्य करून बी टाऊनमध्ये जबरदस्त खळबळ माजवली आहे. जेव्हा कधी मी तणावात असेल मला स्ट्रेस असेल त्यावेळी बॉयफ्रेंडबरोबर सेक्स करून मी त्या तणावातून मुक्त होते. तुम्ही बेडमध्ये खूश नसाल तर इतरत्र कोठेही खुश असू शकत नाही, असे काश्मिराने एका मुलाखतीत म्हटले आहे.
 
 
विशेष म्हणजे टीव्ही स्टार कृष्णाशी कश्मिराचे गेल्या अनेक वर्षांपासून गॅटमॅट सुरू आहे. सध्या काश्मिराचा लग्न करण्याचा कोणताही विचार नाही. यापूर्वी ब्रेड लिस्टरमन याच्याशी लग्न करून काश्मिराने घटस्फोट घेतला आहे. परंतु, आता पुन्हा लग्न करण्याचा विचार नाही. त्यामुळे आपल्या सेक्स संबंधी गरजा ती कृष्णाकडून पूर्ण करून घेते, असे तीने जाहीरपणे कबूल केले आहे.
 
डि-स्ट्रेस होण्यासाठी मी बॉयफ्रेंडबरोबर झोपते आणि सेक्स करते. जर कोणी बेडमध्ये खुश नसेल तर तो कधीच खुश होऊ शकत नाही. ऐवढे करून काश्मिराचा लग्न संस्थेवर विश्वास आहे.... वा काश्मिरा वा!

First Published: Monday, March 26, 2012, 17:52


comments powered by Disqus