सलमान-जॅकी चॅन हॉलिवूड सिनेमात एकत्र - Marathi News 24taas.com

सलमान-जॅकी चॅन हॉलिवूड सिनेमात एकत्र

www.24taas.com
 
बॉलिवूडचा दबंग आता झळकणार आहे हॉलिवूड अॅक्शन स्टार जॅकी चॅनबरोबर. सलमान  खान आणि जॅकी चॅन ही स्वप्नवत वाटणारी स्टारकास्ट चक्क एका बॉलिवूड सिनेमासाठी एकत्र येते आहे. या ऍक्शनपटाची चर्चा बॉलिवूडमध्ये जोरदार सुरु आहे.
 
बॉलिवूड आणि हॉलिवूडची मैत्री सध्या वाढताना दिसते आहे. आणि आता य़ात भर पडणार ती दोन सुपस्टार्सची. बॉलिवूडचा दबंग आणि हॉलिवूडचा अॅक्शनस्टार हे आता एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. वेणू रविचंद्रन या साऊथ दिग्दर्शकाचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे. आर्मर ऑफ द गॉड या सिनेमाच्या पार्श्वभूमीवरच हा नवा सिनेमा असणार आहे.
 
सलमानच्या वॉन्टेड सिनेमानंतर तो पुन्हा एकदा अॅक्शन हिरो म्हणून समोर आला आहे. तर जॅकीचेनला हॉलिवूडमध्ये अॅक्शनचा बादशहा मानलं जातं. त्यामुळेच या दोन अॅक्शन स्टार्सना एकत्र आणण्याचं स्वप्न या दिग्दर्शकानं पाहिलं आहे. आता बॉलिवूडवर दबंगिरी करणाऱ्या सलमानलाही जॅकीचेन बरोबर स्क्रीन शेअर करण्याची उत्सुकता नक्की असेल हे वेगळं सांगायला नको.
 
अर्थात दोन सुपरस्टार्स एकत्र येणार म्हंटल्यावर या सिनेमाचं बजेट देखील अव्वाच्या सव्वा असणार हे गृहितंच आहे. या बिगस्टारर सिनेमाचं बजेट सुमारे अडीचशे कोटींच्या घरात असणार आहे. तेव्हा या बिग स्टारर बिग बजेट या बिग सिनेमाची वाट पाहुयात.
 
 
 
 

First Published: Wednesday, March 28, 2012, 16:35


comments powered by Disqus